आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीने घेतली उसळी ; आताचे भाव तपासून घ्या..

जून 21, 2024 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत असल्याचं दिसत आहे. अशातच वटसावित्रीनिमित्त पत्नीला जर एखादा दागिना गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर खिशाला झळ बसू शकते. कारण सोने आणि चांदीच्या किंमतीत आठवड्याच्या शेवटी उसळी आली आहे.

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये गुरुवारी सोने आणि चांदीने दमदार भरारी घेतली होती.जळगावात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. तर चांदी जवळपास १ हजार रुपयांची वाढ झाली. आता सोन्या-चांदीच्या भावात घट कधी होईल याचीच प्रतीक्षा पाहत आहेत.

सध्या जळगावात आता २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६६,१४० रुपयावर तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. या महिन्यात सोन्याने कोणताही नवीन रेकॉर्ड नावावर केला नाही. यामुळे काहीसा दिलासा ग्राहकांना आहे. दरम्यान जळगावात चांदीचा दर ९१००० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी बुधवारी सकाळी चांदीचा दर ८९ हजार रुपयावर होता. त्यात दोन दिवसात तब्बल दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची वाढ दिसून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now