⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

जळगावात एकाच दिवसात चांदी ३००० रुपयांनी महाग, सोनेही महागले; खरेदीपूर्वी भाव तर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली आहे. या आठवड्यात सोन्यासह चांदीनेही मोठी उसळी घेतली. ऐन दिवाळी तोंडावर सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झटका बसला आहे. दरम्यान जळगाव सराफ बाजरात सोने-चांदी दरात पुन्हा वाढ पाहायला मिळाली.

शनिवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा २०० रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर तब्बल ३ हजार रुपयांनी वाढला आहे. यामुळे आता सोन्यासह चांदीच्या किमतीनेही इतिहास रचला आहे.

काय आहेत भाव?
जळगाव येथील सराफा बाजारात आज रविवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७१,६९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९७,००० हजार रुपयावर पोहोचला आहे. ‘जीएसटी’सह सोन्याचे दर ८० हजार ५५० प्रतिदहा ग्रॅम, तर चांदी ९९ हजार ९१० प्रतिकिलेावर पोहोचली आहे.