Gold Rate : सोने दरात एकाच दिवसात मोठी वाढ, खरेदीदारांची उडाली झोप

मे 6, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२५ । अक्षय तृतीयेपासून सोने दरात घसरण दिसून आलीय. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण झाली असताना चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली. सोमवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात प्रति तोळा १८०० रुपयांची वाढ झाली.

gold silver

या दरवाढीनंतर जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोने ९५,८०० (जीएसटीसह ९८६७४ रुपये) रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अमेरिकन डॉलर वधारण्यासह वायदा बाजारातील शेवट्याच्या दिवशी सोन्याचा तुटवडा जाणवल्यामुळे ही दरवाढी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. २२ एप्रिल रोजी सोन्याचा तोळा जीएसटीसह १ लाखाच्या वर गेला होता. यामुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र, अक्षय तृतीयेपासून दरात घसरण दिसून आली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी ९४००० रुपये तोळा असलेले सोने १८०० रुपयांनी वाढून ९५८०० रुपयांवर पोहोचले.

दरवाढीची कारणे अशी यूएस चायना टेरिफ वारचे पडसाद चायनाने डालरची विक्री वाढवल्याने डॉलर खाली आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला आहे. वायदा बाजारात (एमसीएक्स) केल्या जाणाऱ्या वायद्याच्या परिपूर्तीसाठीची एक निश्चित तारीख असते. त्या दिवशी संबधित मालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार कटींग करण्याचा दिवस असतो. तो ५ मे रोजी होता. त्याच्या परिपूर्तीत सोन्याचा तुटवडा असल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment