Gold Rate : सोने दरात पुन्हा तेजी, आता इतका आहे जळगावच्या सराफ बाजारात प्रति तोळ्याचा दर?..

फेब्रुवारी 25, 2025 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२५ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे मौल्यवान धातू वरखाली होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत शुक्रवारी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले होते. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात पुन्हा तेजी आली.

gold silver 1 jpg webp

सोने प्रति तोळ्यामागे २०० रुपयांची वाढ होऊन ८६९०० रुपयांवर पोहोचले. ही तेजी कायम राहील असे जाणकारांना वाटते. मागील पंधरवड्यात ८५ हजारांवर असलेले सोने गेल्या आठवड्यात १३०० रुपयांनी वाढून दर प्रति तोळा ८७ हजारांवर पोहोचले होते.

मात्र, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घसरण झाल्याचा परिणाम म्हणून सोने ८७ हजारांवरून ८६५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. शनिवार व रविवारी आंतरराष्ट्रीय मार्केट बंद असताना सोने २०० रुपयांनी वाढले. सोमवारी पुन्हा त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९८००० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment