Big Breaking : जळगावच्या शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न, स्वातंत्र्यदिन समारोहाच्या वेळची घटना

ऑगस्ट 15, 2021 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अद्याप हा शेतकरी जळगावातील कुठला आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

jalgaon farmenr mantralay

पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. आज सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळानंच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

सविस्तर वृत्त लवकर 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now