जळगाव शहर

आरक्षण जाहीर ! जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ही नावे चर्चेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील २९ महानगर पालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात जळगाव महानगरपालिकेसाठी महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण सोडत जाहीर झाले आहे.

jalgaon manapa

दरम्यान, जळगाव महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे महापौर पदासाठी भाजपने दावा केला आहे. जळगाव महापालिकेसाठी महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निघाल्यामुळे आता भाजप कुणाला संधी देणार? कोणत्या लाडक्या बहि‍णींची महापौरपदावर वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव महानगरपालिका महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, गायत्री राणे, माधुरी बारी, विदया सोनवणे, ही संभाव्य नावे महापौर पदासाठी चर्चेत आहे. यासोबत माजी महापौर तथा पुन्हा निवडून आलेल्या जयश्री सुनील महाजन या देखील या पदाच्या दावेदार आहेत. त्या शिवसेना-उबाठा पक्षातून अलीकडेच भारतीय जनता पक्षात आलेल्या असल्या तरी महापौरपदी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या नावाचा विचार होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button