जळगावात पावसाची जोरदार एन्ट्री; आज ‘येलो अलर्ट’सह ताशी ३० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज!

जुलै 7, 2026 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२६ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आजही राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी आज पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून, मंगळवारी सकाळीच शहरासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली.

rain

आज मंगळवारी सकाळपासूनच जळगाव शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे जळगाव शहरातील अनेक सखल भागांत आणि रस्त्यांवर पाण्याचे डबके तयार झाले होते. सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांची आणि वाहनधारकांची यामुळे काहीशी तारांबळ उडाली.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसासोबतच जिल्ह्यात ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे.

पुढील २-३ दिवस उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पावसाचा कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. या हवामान बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now