---Advertisement---
जळगाव जिल्हा

आजपासून जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून ‘ही’ नवीन सुविधा सुरु

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून (Jalgaon District Police Force) एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. ती म्हणजेच जिल्हा आजपासून(२० फेब्रुवारी) क्युआर कोड स्कॅन (Scan code) करून तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता तक्रार (complaint) नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेच पाहिजे, याची गरजच राहिलेली नाही.

jl police

शाळा, महाविद्यालये, वर्दळीच्या ठिकाणी टवाळखोरांकडून मुली, महिलांची छेड काढली जाते. चोरटे सक्रीय असतात. मात्र, शालेय मुली, महिला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवायला तयार नसतात. तिथे जाणे त्यांना बदनामीकारक वाटते. त्यांची मोठी सोय या क्युआर कोडने होणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात देखील क्यूआर कोड दर्शनी भागात बसवले जातील. कारवाई झाल्यावर तसे संबंधिताना कळवलेही जाईल.

---Advertisement---
image 8

नागरिकांसाठी सुविधा पोलिस ठाण्यात येण्याआधीच आहे त्या ठिकाणावरुन नागरिकांना तक्रार करता यावी म्हणून ही सुविधा जिल्हा पोलिस दलातर्फे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दाखल तक्रारीची २४ तासात दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. – संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक विशेष म्हणजे तक्रार नोंदवल्यावर २४ तासात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारीही यंत्रणेने घेतली आहे. तक्रार नोंदवल्यावर पोलिसांचा प्रतिसाद कसा राहिला, या संदर्भात तक्रारदार यंत्रणेला गुणही देऊ शकेल. शहाण्याने पोलिस स्टेशनची पायरी चढू नये, असे उपरोधाने म्हटले जाते.

तिथले वातावरण पाहून अनेकांना भीतीही वाटते. पोलिस यंत्रणेतील कोणता अधिकारी किंवा कर्मचारी कसा वागेल, यावरही पोलिसांची प्रतिमा अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर ही सोय पोलिस आणि सामान्य नागरिक या दोघांनाही सोयीची ठरणार आहे. जिल्ह्यासाठी एकच क्युआर कोड जिल्हाभरासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी मात्र स्वतंत्र कोड असेल. तो मोबाईलद्वारे स्कॅन केल्यावर तक्रार दाखल करण्यासाठी एक फॉर्म उघडेल. तो भरून सबमिट केला की तक्रार थेट मुख्यालयात दाखल होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---