⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगाव जिल्ह्यात चारा टंचाईचे संकट; जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत आहे. तापमान वाढीसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईसह आता जनावरांच्या चारा टंचाईने देखील डोकवर काढलं आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत २ लाख ५६ हजार ५९९ लहान जनावरे व ५ लाख ९७ हजार ४५९ मोठी जनावरे आहेत. एकूण ८ लाख ५४ हजार ५८ जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत. तर जून अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ८ लाख ५४ हजार ५८ जनावरांना रोज ४३५४.५५ मेट्रिक टन तर महिन्याला १ लाख ३० हजार ६३६.५३ मेट्रिक टन एवढा चारा लागतो. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात उत्पादित होणारा खरीप आणि रब्बी मिळून २३ लाख ९९ हजार ५४८ मेट्रिक टन एकूण चारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

या विभागामार्फत तालुकानिहाय चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी संकरित ज्वारी सुगरगेजचे ९०९ किलो एवढे बियाणे वितरित केले असून, संकरित मका बियाणे २ हजार किलो वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानात पशुपालकांना मुरघास बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही विभागाने सांगितले. गाई, म्हशी, बैलांना पिण्यासाठी दिवसाला ३५ ते ८० लिटर एवढे पाणी लागते. टंचाईग्रस्त भागातील जनावरांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.