जळगाव जिल्हाराजकारण
धरणगावमध्ये ठाकरे गटाला खिंडार; उपशहर प्रमुख रवींद्र जाधवांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । धरणगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
धरणगाव येथील रहिवासी शिवसेनेचे जुने कार्यकर्ते उबाठा गटाचे उपशहर प्रमुख रवींद्र जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, शहर प्रमुख प्रमुख विलास महाजन, मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, हेमंत चौधरी, कमलेश बोरसे, समाधान पाटील, सचिन पवार, एकनाथ महाजन, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.