जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । जळगाव येथील जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

एका पत्राद्वारे त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तर भविष्यात शहरातील मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल अशी आम्हाला खात्री आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतीशील आमदाराची आवश्यकता आहे असा आशय पत्रामधून व्यक्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button