जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ३१.७६ टक्केच पाणीसाठा शिल्लक

जुलै 6, 2021 5:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून जुलैचा पहिला आठवड्यातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. 

hatanur dam

जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा 16.01 टीएमसी म्हणजेच 31.76 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 39.95 टक्के इतका म्हणजेच 8.19 टक्के इतका अधिक होता. असे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात अवघा 13.25 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 1.60 टीएमसी, गिरणा 6.16 टीएमसी तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.60 टीएमसी (17.73%) गिरणा धरणात 6.16 टीएमसी (33.31%) तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी (62.66%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 66.77%, मंगरुळ 46.17%, सुकी 72.21%, मोर 54.02%, तोंडापूर 41.93%, बहुळा 19.93%, अंजनी 19.31%, गुळ 26%, मन्याड 17.47% तर भोकरबारी धरणात 15.12% उपयुक्त साठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील सुकी आणि भोकरबारी धरण क्षेत्रात यावर्षी साधारण पाऊस झाल्याने या धरणातील साठा हा मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकावरुन दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now