जळगाव शहर हादरले; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार

डिसेंबर 17, 2024 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२४ । महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत असून अशातच जळगावातील २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Untitled design 15 jpg webp

याबाबत असे की, जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित तरुणाने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

दरम्यान, हा अत्याचार असेही झाल्याने तिने अखेर एमआयडीसी पोलिसातून तक्रार दिली. त्यानुसार संशय आरोपी राहूल पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now