---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

मोठी बातमी : जळगावच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात, अनेक विद्यार्थी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. आज सकाळी महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील गावात हा अपघात झाला असून या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

apghat jpg webp webp

अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे.

---Advertisement---

अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते.विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---