जळगावातल्या सभेत मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी ; म्हणाले.. एक बार जो मैने कमिटमेंट कर दी…

जानेवारी 9, 2023 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.

eknath shinde jpg webp

यावेळी मनोगतात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता असं म्हटलं. या डायलॉगवर सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शिंदे म्हणाले की, समाज छोटा आहे असं काही नाही, आपण मनाने मोठे आहात. मी दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांनी विश्वास ठेवला, असं मुख्यमंत्री म्हणाले. मी माझ्या राजकीय जीवनात दिलेला शब्द पडू देत नाही, ही माझी काम करण्याची पद्धत आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिंदे व भाजप सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्याची हवा गेली असल्याची टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमानंतर बोलताना म्हटलं की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्राचे जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडगुजर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच विविध मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन केंद्र सरकारकडे विनंती करू आणि सरकार म्हणून ते सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now