अवैध मद्यविक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर हल्ला

मे 26, 2021 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणारी एक महिला अवैधरित्या मद्य विक्री करते. चार दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी महिलेवर कारवाई केली. पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून महिलेने शिवीगाळ करीत तिच्या अल्पवयीन मुलाने तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.

jalgaon crime

शिवाजीनगर हुडको परिसरात मातोश्री किराणाजवळ राहणारी मीना रविंद्र जगताप नामक महिला अवैधरित्या मद्य विक्री करीत असते. महिलेच्या घरी ५ दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करताना महिलेला तुझ्याबाबत फोटो आणि व्हिडीओ आले असल्याचे तिला सांगितले.

आपल्याबद्दल फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना दिल्याच्या संशयावरून मिनाबाई दोन दिवसांपासून ईश्वर नवल वाणी यांच्यासह कुटुंबियांना शिवीगाळ करीत होते. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या मिनाबाईसह तिच्या मुलाने ईश्वर यांना शिवीगाळ करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. शाब्दिक वाद वाढल्याने मिनाबाई हिने ईश्वर यांच्या हाताला चावा घेतला तर मुलाने चाकूने हल्ला केला. ईश्वर यांना छातीवर आणि हातावर जखम झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात संबंधित महिलेने देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे समजते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories