राष्ट्रीय फिंन स्विमींग स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंचे वर्चस्व!

ऑगस्ट 12, 2022 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । अंडरवॉटर स्पोर्ट्स अससोसिएशन इंडिया आयोजित 5व्या फिंन स्विमींग राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन शिशुकुंज इंदोर (मप्र )येथे ५ ते ७ दरम्यान, कारण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील 24 राज्याचे व दोन केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंनी आपआपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केल, याच स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व 15 खेळाडूंनी केले, ज्यात जळगांव मधील 12 खेळाडूंनी पदक प्राप्त केले.

jalgaon 10 2

पदक प्राप्त खेळाडू
वृषाली कैलास बडगुजर – कास्य, अन्वी संदीप चौधरी – रजत, अर्पिता अनिल कदम – कास्य,पलक विवेक चौधरी – 3 कास्य,विधी महेश वर्मा – सुवर्ण,ऋतुजा हर्षल भंडारी – 2 रजत,अस्मि राकेश गावंडे – 2 रजत,कुलदीप किरण बच्छाव – सुवर्ण,पार्थ गोकुळ आहिरे – कास्य,यश पुरुषोत्तम बागड – रजत,ध्रुव शिवाजी पाटील – रजत,यज्ञेश महेश जोशी -2 कास्य (संघप्रमुख)

राष्ट्रीय स्तरावर अश्या प्रकारची कामगिरी करणारे शहरातील हा प्रथम संघ आहे, ह्या खेळाडूंचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.हे सर्व खेळाडू एकलव्य क्रीडा संकुल जळगाव येथे सराव करतात, या स्पर्धेकरीता खेळाडूंना एकलव्य क्रीडासंकुलाचे संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षक वैभव सोनवणे व अखिलेश यादव यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now