जळगावच्या प्रौढाची मुक्ताईनगरात गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 1, 2021 7:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । शहरातील मुक्ताईनगरात राहणार्‍या प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. नंदकिशोर भालचंद्र तिवास्कर (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी नंदकिशोर तिवास्कर यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान त्यांची पत्नीच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला.

याबाबतची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाली उतरवित तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी वंदना तिवास्कर यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now