भयंकर ! जळगाव शहरात डंपरने ९ वर्षीय बालकाला चिरडले; संतप्त नागरिकांनी डंपरला पेटविले

डिसेंबर 25, 2024 9:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरात होणाऱ्या अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीय. अशातच आज बुधवारी सायंकाळी जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर चौकात एक डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे ९ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी धडक देणाऱ्या डंपरची जाळपोळ केली.

JL Accident

याबाबत असे की, योजेस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते.

त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजेस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now