---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Jalgaon Accident : जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत ट्रॅक्टर उलटला, तरुण जागीच ठार, तिघे जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । जळगाव शहरात पुन्हा अपघात झाल्याची बातमी समोर आलीय. ज्यात भरधाव डंपरने विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार कट मारल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाला. यात ट्रॉलीखाली दाबला गेल्याने एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ आज शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. अंकुश आत्माराम भिल (वय-२७, रा. डिकसाई ताम जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर ताब्यात घेतला आहे. दरम्यान ही घटना परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे .

AC

जळगाव शहरात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात अनेकांचा जीव गेला आहे. यातच आज शनिवारी (दि २५) सकाळी शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २९०६) हा विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणाऱ्या डंपरने ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला कट मारला. यात ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टर वर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

---Advertisement---

तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल (वय-२२), गणेश भगीरथ भिल (वय-१८), आणि शुभम सुखा भिल (वय -२०) तिघे राहणार विदगाव ता. जळगाव हे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---