जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी कार्यवाही; 98 आरोपींकडून 100 पिस्तूल जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी नोव्हेंबर अखेर 100 पिस्तूल व रिवाॅल्वर जप्त केल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र ठेवणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या अशा 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ही कार्यवाही जिल्ह्यातील आणि राज्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आवरण्यासाठी पोलिस खात्याने विशेष अभियान हाती घेतले होते. या अभियानातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अवैध शस्त्रांची जप्ती. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर असलेल्या लहान उमर्टी व मोठ्या उमर्टी या ठिकाणी अवैध शस्त्र निर्माण करण्याचे काम होते. याच ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चोपडा मार्गे, यावल मार्गे अशा विविध मार्गाने अवैध शस्त्रांची आवकजावक होत असते.
जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये एकूण 63 केसेस नोंदविण्यात आलेले आहेत. या कारवाईमध्ये शंभर पिस्तूल व रिवाॅल्वर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 166 काडतूस असे एकूण 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या प्रकरणी 1 जानेवारी 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.