थोरगव्हाण येथे तलवार बाळगणाऱ्यास अटक

एप्रिल 30, 2022 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । तलवार बाळगणाऱ्या दोन संशयितांना सावदा पोलिसांनी तलवारीसह अटक केली. या प्रकणारी सावदा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

crime 18 jpg webp

अधिक माहिती अशी की, सावदा पो,स्टे हद्दीतील थोरगव्हाण गाव जवळ देशी दारू अडया जवळ रायपूर रस्त्याने दुचाकी (क्र. MH 10, AF 1679 ) यावरून आकाश विष्णू सपकाळे वय 22 व अनिल मनोहर तायडे वय 21 रा, रायपूर ता, रावेर हे जात असताना त्यांना सावदा पोलिसानी संशयावरून अडवले, विचारपूस व तपासणी केली असता त्यांचे जवळ 2 तलवारी आढळून आल्याने पो, ना, अक्षय हिरोळे यांचे फिर्यादी वरून आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सावदा पोलीस करीत आहे.

यांनी केली अटक

सदर कामगिरी स.पो.नी. देवीदास इंगोले, पी.एस.आय. समाधान गायकवाड, पो.हे.कॉ.संजय चौधरी, स.पो. माहेमुद शहा, पो.हे.कॉ.खोडपे, उमेश पाटील, यशवंत टहाकळे यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now