⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मोठी बातमी ! जिल्ह्यातील अजून एका शिवसेना आमदाराचे होणार निलंबन

 जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावली असताना थातूर मातूर कारणे देत गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. शिवसेनेकडून केवळ १३ आमदारांचा उल्लेख करण्यात आला असून त्यात चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे (Chopda MLA Lata Sonawane) यांचा देखील समावेश होता. आता अजून ४ आमदारांची नाव त्यात वाढ केली गेली आहे. ज्यात एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत असून दररोज नवीन बातमी कानी येत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांच्या बळावर स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा त्यांना पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे शिंदे यांच्या बंडाला प्रत्युत्तर देत स्वतःचे बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने देखील प्रयत्न सुरू केले आहे. शिंदे गटाचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने अगोदर गटनेता बदलला, त्यानंतर प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. गुरुवारी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. आज अजून ४ आमदार आमदारांची यात वाढ करण्यात आली असून एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश आहे.

शिवसेनेने बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला व्हीप बजावल्यावर देखील एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार थातूरमातूर कारणे देत गैरहजर राहिले होते. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्या आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलेली अशी मागणी विधिमंडळ कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

शिवसेनेकडून केवळ १३ च आमदारांच्या आमदारकी रद्द करण्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यात चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे यांच्या नावाचा देखील उल्लेख होता. आता त्यात एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश आहे.