⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाकरांनो…! थर्टी फर्स्ट साजरा करताय? मग ही बातमी नक्की वाचाच, अन्यथा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । जळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. कित्येकांचे प्लॅन तयार झाले आहेत. नववर्ष कस साजर करायच? याबाबत कित्येकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र अशा सर्व जळगावकरांनी ही बातमी वाचणे अतिशय गरजेचे आहे. कारण शहरासह जिल्ह्यातील विविध भागात एकूण १२४८ पोलिसांचा बंदोबस्त थर्टी फर्स्टच्या रात्री रस्त्यावर राहणार आहे.

थर्टी फर्स्ट पार्टी झाली की त्यावरून कोणताही कायदा व सुव्यवस्था यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 51 ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्ह केससाठी विशेष तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नाकेबंदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलिसांचा म्हणजेच अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. ब्रेथ अनिलायझर द्वारे ही तपासणी केली जाणार आहे. गेल्या दोन वर्षापासून ही तपासणी करण्यात आलेली नव्हती. संशयितांना पकडून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. मात्र आता जागेवरच कारवाई होणार आहे. जिल्ह्यात असे 51 पॉईंट ठरवण्यात आले आहेत.

थर्टी फर्स्टला असा असेल बंदोबस्त
पोलिस अधीक्षक – ०१
अपर पोलिस अधीक्षक – ०२
पोलिस उपअधीक्षक – ०९
पोलिस निरीक्षक – ३०
सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक – १३८
पोलिस अंमलदार – ८६६
क्यूआरटी पथक – ०१
आरसीपी पथक – ०८