पाटबंधारे उपविभागीय अधिकारी निळकंठ महाजन सेवानिवृत्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । यावल हातनुर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी निळकंठ महाजन आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवा निवृत्त होत आहे. सर्वप्रथम नाशिक पाटबांधारे प्रकल्प, अन्वेषण विभागात सेवेत ते रुजु झाले होते.
महाराष्ट्र राज्यातील हतनुर धरण हे एक मोठे धरण असून जळगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या धरणाला शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे. अशा मोठया प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर व कार्यतत्पर राहत आपली सेवा देणारे उपविभागीय अधिकारी निळकंठ प्रल्हाद महाजन हे पाटबंधारे विभागाच्या आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कार्यानंतर आज रोजी सेवानिवृत्त होत आहे.
यावल तालुक्यातील सातोद या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले निळकंठ महाजन यांनी आपले प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सातोद येथील प्राथमिक शाळेतुन केली त्या नंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण फैजपुर, अमरावती व नागपुर येथे पुर्ण केले. महाजन यांनी आपल्या प्रशासकीय सेवा कार्याची सुरुवात सन १९८४ मध्ये केली. ते सर्वप्रथम नाशिक पाटबांधारे प्रकल्प, अन्वेषण विभागातील सेवेत ते रुजु झाले.
१९८६ ते ८७ या कालावधीत त्यांनी मध्यम प्रकल्प विभाग, हिवरा प्रकल्प या ठीकाणी सेवा बजावली त्यानंतर १९८७ ते ८९ या काळात धानोरा तालुका चोपडा या हतनुर कालवा विभागात होते. १९८९ ते १९९५ या काळात लघु पाटबंधारे विभाग, चिखली जिल्हा बुलढाणा तसेच १९९५ ते १९९७ पर्यंत ते खडक पुर्णा प्रकल्प विभाग, देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा, १९९७ ते २००६ पर्यंत जळगाव पाटबंधारे विभाग यावल जळगाव, २००६ ते २०१३ या काळात ते गिरणा पाटबंधारे विभाग तालुका एरंडोल जिल्हा जळगाव, वर्ष २०१४ ते २०२१ जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव (हातनुर ) व २०२१ ते २०२२ जूनपर्यंत यावल हतनुर पाटबंधारे विभाग या ठिकाणी त्यांचा ३८ वर्षाच्या आपल्या प्रशासकीय सेवाकार्य संपत आहे. ते आपल्या ३८ वर्षाच्या प्रशासकीय सेवेला चांगले योगदान देवुन आपण सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.