⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

ठरलं तर ! iPhone 14 ची किंमत भारतात ‘इतकी’ असेल? त्वरित जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । ॲपलचा(APPLE ) मेगा लाँच इव्हेंट पार पडला. यावेळी प्रतीक्षेत असलेल्या iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच झाले आहेत. यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लाँच करण्यात आले. iPhone 14 चे फोने 16 सप्टेंबरपासून विक्रीस येणार आहे. मात्र भारतात आयफोन 14 सीरीजची किंमत किती असेल याबाबत एक माहिती समोर आलीय.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus ची भारतात किंमत
भारतीय ग्राहक iPhone 14 79,900 रुपयांना आणि iPhone 14 Plus 89,900 रुपयांना खरेदी करू शकतात. iPhone 14 ची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर iPhone 14 Plus ची विक्री 7 ऑक्टोबरपासून होईल.

iPhone 14 Pro आणि iphone 14 Pro Max ची भारतात किंमत
iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरू होते जी गेल्या वर्षीच्या iPhone 13 Pro पेक्षा 10,000 रुपये जास्त आहे. iPhone 14 Pro Max ची किंमत 1,39,900 रुपयांपासून सुरू होते जी 2021 पासून iPhone 13 Pro Max पेक्षा 10,000 रुपये जास्त आहे. सेल 16 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि तुम्ही आजपासून प्री-ऑर्डर करू शकता.

AirPods Pro भारतात किंमत :
AirPods Pro (दुसरी पिढी) भारतात 26,900 रुपयांना उपलब्ध होईल. ते ९ सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी जातील. 23 सप्टेंबरपासून उपलब्धता आहे.

Apple Watch Series 8 ची भारतात किंमत
भारतात वॉच सीरीज 8 ची किंमत 45,900 रुपये असेल. SE 2 चे वॉच रु.29,900 पासून सुरू होईल.