जळगाव जिल्हा

जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृंध्दीगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २९ सप्टेंबर पर्यंत या लिंकवर https://forms.gle/289521GyugghSDk99 ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन- “भारत @2047 युवा संवाद” इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता पात्रता
स्पर्धक हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा, दि. 01/04/2022 रोजी वय 15 ते 29 पर्यंत, एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

बक्षीस
१) चित्रकला, २) कविता लेखन व ३) छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा: ( सहभागी संख्या – प्रत्येकी 30 )
प्रथम रु. 1000/-, व्दितीय रु.750/- तृतीय रु.500/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
4) जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा : सहभागी संख्या 10
प्रथम रु.5000/-, व्दितीय रु.2000/- तृतीय रु.1000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
5) जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) : सहभागी संच 10 – एका ग्रमप मध्ये कमीत कमी 5 जास्तीत जास्त 20 स्पर्धक ( समूहनृत्य) : प्रथम रु. 5000/-,व्दितीय रु.2500/-तृतीय रु.1250/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
6) जिल्हास्तरीय युवा सम्मेलन- “भारत @ 2047 युवा संवाद” सहभागी संख्या 100
या कार्यक्रमामधील सहभागी युवकांमधून विषयाची मांडणी, वक्तृत्व शैली या आधारावर 4 चार युवकांची परिक्षकांव्दारा
निवड करुन त्यांना प्रत्येकी 1500/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, 425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल : [email protected] कार्यालयाला संपर्क साधावा. जिल्हातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावेत असे आवाहन नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जळगाव यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button