⁠ 
सोमवार, मे 27, 2024

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सोने-चांदीच्या किंमती आणखी खाली आल्या, पहा आताचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या खरेदी करणाऱ्यांना घाम फोडला. दोन्ही धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले असून सोने-चांदीची घौडदौड सुरु असताना गेल्या आठवड्यात तुफान दरवाढील ब्रेक लागला तर नव्या आठवड्याची सुरुवातही घसरणीच्या झाली आहे.

विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे भाव कमी होत असून चांदीची किंमतही स्वस्त होत आहे. आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.MCX वर सोमवारी सोने आणि चांदी घसरणीसह उघडले. एकेकाळी सोन्याचा भाव सातत्याने वाढून ७४,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता पण आता सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरणीचा कल दिसून येत आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव काय
मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोमवारी जून सोन्याचा वायदा २२९ रुपयांनी कमी होऊन ७१,२७१ रुपये प्रति १० ग्रॅमवर दिसून आला असून सकाळपासूनच सोन्याचा भाव घसरत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही गेल्या दहा दिवसांत घट झाली आहे, आज दुपारी एमसीएक्सवर चांदीचा ८०,५४५ रुपयांवर ट्रेंड करत आहे.

सोन्याचा दर का कमी होतोय?
काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती. इंधनाचा दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच काळात सोनंही चांगलंच महागलं होतं. दोन्ही देशांतील या तणावात सोन्याचा दर 74 हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढला होता. कालानंतराने इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाची शक्यता कमी होत गेली, परिणामी सोन्याचा दरही कमी होत गेला. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता सोन्याचा दर 70 हजार रुपये प्रति ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो. सोने आणि चांदीचा दर असाच कमी झाला तर, लग्नसराईत सोने धातूची खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.