डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

मे 13, 2026 5:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे मुख्य परिचारिका अधीक्षक कार्यालयासमोर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाची संकल्पना आमच्या परिचारीका आमचे भविष्य सक्षम परिचारीका जिव वाचवतात अशी होती.

UPparicharika day

आरोग्य सेवा आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी परिचारिकांचे निःस्वार्थ योगदान, समर्पण आणि अथक परिशम यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक फलोरेस नाईटीगल यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात कुशल, प्रशिक्षित आणि सशक्त परिचारिकांची आरोग्य व्यवस्थेमधील भूमिका अधोरेखित करण्यात आली. परिचारिका समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असून त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी परिचारिका वर्गाच्या समर्पित व मानवतावादी सेवेसाठी त्यांचे कौतुक करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now