जळगाव शहर

पी.जी.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिवस उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । के.सी.ई च्या पी.जी.महाविद्यालयात, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील. प्रा. धनश्री पाटील, प्रा. एकता फुसे, डॉ.आर. एम. पाटील उपस्थित होते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

विविध सूक्ष्मजीव शास्त्रीय संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्राचार्य. झोपे यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. 17 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन आहे.सूक्ष्मजीवशास्त्राचा वार्षिक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. प्रा.संदीप पाटील यांनी सूक्ष्मजीवांची विविधता वाढवण्याची संधी, मानवी आरोग्य, संस्कृती, आर्थिक क्रियाकलाप, रोजगार आणि आपल्या दैनंदिन जीवनात सूक्ष्मजीव किती महत्त्वाचे आहेत हे ओळखण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित करण्याचा हा एक मार्ग आहे असे प्रतिपादन केले.

प्रा.संदीप पाटील, धनश्री पाटील, एकता फुसे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार समाधान माळी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आंचल पवार, द्वितीय क्रमांक रेहान पटेल, तृतीय क्रमांक पुनम पाटील यांनी पटकावले. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अमृता खडसे,प्रांजल सुरवाडे तर द्वितीय क्रमांक प्रतीक्षा, पाटील व ऋतू पाटील यांनी पटकावले. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक समाधान माळी तर द्वितीय क्रमांक गुनश्री भालेराव हिने पटकावला.

Related Articles

Back to top button