गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटिलिजन्स ब्युरो (IB) मार्फत मोठी भरती निघाली आहे. एकूण तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर https://www.mha.gov.in/en या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 पर्यंत आहे. Intelligence Bureau Bharti 2023

एकूण 797 जागांसाठी ही भरती होईल. ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 325 जागा, ईडब्ल्यूएससाठी 79 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 215, एससी प्रवर्गासाठी 119 आणि एसटी प्रवर्गासाठी 59 जागा समाविष्ट आहेत.
पदाचे नाव:
ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech)
महाराष्ट्रात तलाठी पदाच्या मेगाभरतीबाबत आदेश जारी
आवश्यक पात्रता:
इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी.
वयाची अट:
23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
किती फी भरावी लागेल?
खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ₹500/ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/ExSM/महिला यांना ₹450 रुपये फी लागेल.
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवांना Rs.25,500-81,100 रुपये पगार मिळेल