कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकरांना मोठा दणका ; गृहविभागाने अतिरिक्त कार्यभार काढला

मे 29, 2025 6:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे.दरम्यान, या प्रकरणात जळगावचे तत्कालीन आणि सध्याचे कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर देखील सातत्याने आरोप होत असून अशातच गृहविभागानं मोठी कारवाई केली आहे. ती म्हणजे जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्यामुळे खळबळ उडाली.

jalinder supekar

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणेचे मामा विशेष पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती.

यातच आजच वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावेळी, पत्रकार परिषदेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे म्हटले होते, मुलाच्या जन्मपत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नाव आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, काही वेळातच गृहविभागाने मोठी कारवाई करत जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेतल्याचे समोर आलं आहे.

जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. जालिंदर सुपेकर यांच्याकडून हा पदभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि नागपूरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment