⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | चौकशी अहवाल प्रकरण : रावेरात आमरण उपोषण

चौकशी अहवाल प्रकरण : रावेरात आमरण उपोषण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील निंभोरा-तांदलवाडी जि.परिषद गटात झालेल्या कामांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, मागणी करून देखील हा अहवाल तक्रारदाराला दिला जात नाही. यामुळे बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे व तडवी आदिवासी भील एकता मंचच्या बबिता तडवी यांनी सोमवारपासून येथील पंचायत समितीसमोर आमरण उपोषण पुकारले आहे.

निंभोरा-तांदलवाडी गटात गेल्या ५ वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झालेली आहेत. या कामांच्या ई-निविदेसह चौकशी करण्याची मागणी विविध दलित व आदिवासी संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून २६ जुलैला केली होती. त्यानंतर १५ ऑगस्टला जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार सदस्य समिती नेमून झालेल्या कामांची चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल मागवला होता.

मात्र, सात महिने उलटूनही चौकशी अहवाल सादर केलेला नाही. अधिकारी चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. हा चौकशी अहवाल मिळावा यासाठी सोमवारपासून येथील पंचायत समितीसमोर बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे व आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या बबिता तडवी या उपोषणाला बसल्या आहेत. दलित व आदिवासी संघटनांच्या मागणीनुसार प्रशासनाने कामांची चौकशी केली असेल, तर अहवाल का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह