एरंडोलजळगाव जिल्हा

आडगाव येथील अतीक्रमणाची झाली चौकशी; अहवाल अजुनही गुलदस्त्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । एरंडोल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी स्वत:च्या जागेपेक्षा जास्तीचे बांधकाम करून अतीक्रमण केल्याची तक्रार पंचायत समिती प्रशासनाकडे करण्यात आलेली होती.
याप्रकरणी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर.एस.सपकाळे यांनी चौकशी केली व चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष जगन्नाथ माळी व छाया सुभाष पाटील यांनी अतीक्रमण केल्याबाबतची तक्रार सरपंच सुनिल दिलीप भिल, रविंद्र हरी साबळे, रविंद्र आसाराम महाजन यांनी पंचायत समिती एरंडोल प्रशासनाकडे केली. त्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात आली व वरीष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला. केलेल्या तक्रारी प्रमाणे दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी अतीक्रमण केले आहे का? याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सूकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button