रविवार, डिसेंबर 10, 2023

हरवले आहेत : शोधण्यास मदत करावी अशी कुटुंबीयांची विनंती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । एरंडोल येथील रहिवासी प्रकाश मोतीराम साळी (अण्णा साळी गांधीपुरा) हे मागील महिन्यापासुन घरातुन न सांगता निघुन गेलेले आहेत.तरी कुठेही आढळल्यास खालील नबंर वर संपर्क करावा आणि सहकार्य करावे असे आवाहन घरच्यांनी केले आहे. (prakash sali )

प्रकाश साळी हे 22 मे रोजी दुपारी कंपनीतुन घरी आले. डबा घेऊन कंपनीकडे निघाले. मात्र त्यानंतर ते घरी आलेच नाहीत. गेल्या महिन्याभरापासून ते कुठे आहेत हे त्यांच्या कुटुंबीयांना माहित नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतीत आहेत.

याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात नोंद दाखल केली असून नोंदीनुसार त्यांची उंची पाच फूट पाच इंच आहे. ते गोऱ्या रंगाचे आहेत. अशा वेळी यांच्या विषयी काहीही माहिती मिळाली तर घरच्यांची संपर्क करावा असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे

संपर्क क्रमांक
9518946450 ,
9104685916,
8390738209