मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या कामकाजाची चौकशी करा – राष्ट्रवादी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । मनपाचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या कामकाजाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, मनपाचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांची नेमणुक झाल्यापासुनच त्यांच्या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे व कामगिरीमुळे ते बदनाम आहेत. गैरव्यवहार व भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे, शिक्षा झालेल्या नगरसेवकांबाबत ठोस भूमिका न घेणे, वॉटर ग्रेस, अमृत असलेली पाईपलाईन व भुयारी गटार, घनकचरा प्रकल्प, एल. ई. डी. लाईट, तुरटी पुरवठा, अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नेमणूका, नियमबाह्य ठरावांचीची अंमलबजावणी आदी विषयांबाबत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन भ्रष्टाचाराबाबत चर्चेत असुन महानगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. अनेक कामे बेकायदेशीरपणे सुरू असुन वाढीव दरात अंदाजपत्रके देणे व निविदा अतिशर्ती नुसार दंड आकारणी न करणे इत्यादींबाबत मनमानी सुरू आहे. परंतु याविषयी कुणीही दखल घेत नसल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची हिम्मत वाढत असुन केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, जिल्हा नियोजन समिती कडुन येणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत हि तक्रारी वाढत असुन मक्तेदारकडून 3 ते 5 टक्के मागणी करण्यात येत असल्याची तक्रार अभियंता अरविंद भोसले यांनी प्रधान सचिव ( 2 ) नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडे केलेली असुन त्या अर्जाच्या प्रति नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटिल, जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवलेल्या आहेत. तसेच यासंदर्भात बातम्या देखील स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. सदर प्रकार हा गंभीर असुन अभियंता अरविंद भोसले यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या संशयास्पद कामकाजाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव महानगर तर्फे करण्यात आली.
यावेळी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, उपाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण राजपूत, सरचिटणीस सुनील माळी, विशाल देशमुख, सुशील शिंदे, डॉ.रिजवान खाटिक, जितेंद्र बागरे, प्रवीण माळी, संजय हरणे, किरण चव्हाण उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन