जळगावच्या महादेव हॉस्पीटलला इंदोरचे प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडेंची सेवा उपलब्ध

ऑक्टोबर 24, 2025 3:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुबई, पुणे, दिल्ली आणि इंदोर येथील प्रदिर्घ सेवेनंतर जळगाव शहरात प्रथमच शहरवासीयांची सेवा करण्यासाठी विद्यानगर आकाशवाणी चौकातील महादेव सुपरस्पेशॅलीटी हॉस्पीटले येथे प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

kamlesh tayde

डॉ. कमलेश यांनी एमबीबीएस पदवी ससून रूग्णालय पुणे,एमडी पदव्युत्तर सायन रूग्णालय मुबंई,डी एम न्युरोलॉजी एम्स नवी दिल्ली येथून पुर्ण केले असून सायन रूग्णालय मुबंई, चोईथराम हॉस्पीटल इंदोर येथील न्युरोलॉजी विभागाचा प्रदिर्घ अनुभव असून हजारो रूग्णांवर यशस्वी उपचार देखिल केले आहे. महादेव हॉस्पीटल येथे ते सकाळी ९ ते ५ या वेळेत तपासणी करणार असून अर्धांग वायू/ पॅरालीसीस/लकवा पक्षाघात, मान दुखी, पाठ दुखी, मेंदूचे आजार, सायटिका डिस्क मायग्रेन, बोटॉक्स इंजेक्शन, पार्किन्सन/कंपवात, हाताचे किंवा पायाचे कंपन तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, बोलण्यात किंवा चालण्यात अडचण, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, दृष्टी बदलणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा झटके या सारख्या आजारांवर ते उपचार करणार आहे.

मुबंई,पुणे, दिल्ली आणि इंदोर येथे सेवा देतांना अनेक प्रसिध्द न्युरोलॉजीस्टचे मार्गदर्शन आणि अनुभव मिळवलेले मुळ जळगावचे असलेल्या डॉ तायडे यांना आपल्या गावातील लोकांची सेवा करण्याची इच्छा असल्याने ते आता महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून रूग्णांना अल्प दरात सेवा देणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा असे आवाहन रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

मेंदू, मज्जातंतू व स्नायूंच्या आजारांसाठी महत्त्वाच्या तपासण्या सवलतीत

रुग्णांच्या मेंदू, मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यातील बिघाड समजण्यासाठी काही विशेष वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या तपासण्यांमुळे डॉक्टरांना अचूक निदान करून योग्य उपचार ठरवता येतात. EEG (इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी) मेंदूतील विद्युत क्रिया नोंदविण्याची चाचणी. एपिलेप्सी, झटके, चेतासंस्थेशी संबंधित समस्या ओळखण्यासाठी उपयोगी. NCS (नर्व्ह कंडक्शन स्टडी) – मज्जातंतूंच्या वहन क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी केली जाणारी तपासणी. हात-पाय सुन्न होणे, जळजळ किंवा कमजोरी अशा तक्रारींसाठी महत्त्वाची. EMG (इलेक्ट्रोमायोग्राफी) – स्नायूंच्या विद्युत क्रियांची नोंद घेऊन स्नायूंच्या विकारांचे निदान करण्यात मदत करणारी चाचणी. MRI / CT Scan – शरीराच्या आतील रचनांचे तपशीलवार चित्र मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक इमेजिंग तपासण्या.Lumbar Puncture (लंबर पंक्चर) – कण्यातील द्रव (Cerebrospinal Fluid) तपासून मेंदू व मज्जारज्जूशी संबंधित संसर्ग, रक्तस्त्राव किंवा इतर आजार समजण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया.

या सर्व तपासण्या न्युरॉलॉजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात आणि योग्य निदानासाठी अत्यंत आवश्यक आहेत. डॉ. कमलेश तायडे यानी तपासणी नंतर रुग्णांना चाचण्या करण्यास सांगितल्या अशा वरील सर्व चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now