जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । भारतीय डाक विभागात (Indian Post Department) डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव (Jalgaon) विभाग जळगाव -४२५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे (interview) विमा प्रतिनिधींची (insurance representatives) नेमणूक निवड करण्यात येणार आहे.

उमेदवाराचे वय वय १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार १० वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारास विमा पॉलीसी विक्रीचा अनुभव , स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी. बेरोजगार तरुण/तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणताही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी विमा सल्लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. ही निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांचेकडे राखीव असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, PAN कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य सबंधित दस्तऐवज सोबत जोडून दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ११ ते ०३ या वेळेत अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव, पांडे चौक, पहिला मजला, मुख्य डाकघर जळगाव ४२५००१ (फोन.न. 02588-2224288, Mobile-9822050189) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.