जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी कंपनीत काम करण्याची उत्तम संधी चालून आलीय. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. पाइपलाइन डिवीजनमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२६ असणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. एकूण ३९४ पदांसाठी भरती करणार आहे. आसाम, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

इंडियन ऑइलमधील ट्रेक्निशियन अप्रेंटिस ट्रेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनियरिंग ऑटोमोबाइल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेट्रॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.









