जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय नौदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.एकूण 254 रिक्त पदांवर भरती होणार आहे. 24 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी संबंधित शाखेत किमान ६०% गुणांसह BE किंवा B.Tech केलेले असावे. सामान्य सेवेसाठी, पायलट, नेव्हल ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर शाखा/संवर्गासाठी, अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. लॉजिस्टिक्ससाठी एमबीए असणे आवश्यक आहे. तर शिक्षण शाखेसाठी M.Tech/MSc पात्रता मागितली आहे.
वय मर्यादा : उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2000 ते 1 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया
अर्ज केल्यानंतर, पात्रता पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
यानंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
SSB मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण
अंतिम निवड झाल्यानंतर, उमेदवारांना सब लेफ्टनंट म्हणून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, एखाद्याला NAIC मध्ये तीन वर्षे आणि इतर शाखांमध्ये दोन वर्षे प्रोबेशनवर काम करावे लागेल. त्यानंतर कायमस्वरूपी नियुक्ती होईल.
तुम्हाला किती पगार मिळेल?
या पदावर रुजू झाल्यानंतर मूळ वेतन 56100 रुपये प्रति महिना असेल. यासोबतच इतर अनेक भत्तेही मिळतील.