भारतीय हवाई दलात 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज?

जानेवारी 14, 2026 1:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय हवाई दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायु पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अग्निवीर वायु INTAKE 01/2027′ या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2026

indian air force jpg webp

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.हवाई दलातील या नोकरीसाठी अविवाहित तरुण आणि तरुण सहभागी होऊ शकतात. Indian Air Force Bharti

शैक्षणिक पात्रता

हवाई दलातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी पास केलेले असावे, याचसोबत गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयात ५० टक्के गुण मिळवलेले असावे. याचसोबत मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स केलेला असावा.

वय मर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय १७.५ वर्षे आणि कमाल वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच त्यांचा जन्म १ जानेवारी २००६ पूर्वी आणि १ जुलै २००९ नंतर झालेला असावा. शिवाय, पुरुष आणि महिला दोघांचीही उंची किमान १५२ सेमी असणे आवश्यक आहे. राखीव क्षेत्रांसाठी सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Online Registration For AGNIVEERVAYU INTAKE 01/2027 वर जायचे आहे.
यानंतर IAF Agniveer Vayu 01/2027 चा लॉगिन डॅशबोर्ड दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
यानंतर तुमची माहिती भरा. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात कागदपत्र अपलोड करा.
यानंतर फोटो आणि सही स्कॅन करुन अपलोड करा. फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now