⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला केले प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषक-2022 चा दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. आज जो संघ जिंकेल, तो फायनलमध्ये प्रवेश करेल. जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. India vs England World Cup T20 Match:

पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवत सुपर-12 फेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर इंग्लंडने गट-1 मध्ये दुसऱ्या स्थानावर प्रवेश केला. टीम इंडियाने सुपर-12 फेरीत फक्त एकच सामना गमावला आणि 4 सामने जिंकले. त्यांचा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 पैकी 3 सामने जिंकले आणि एकात पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना पावसामुळे रद्द झाला.