दिव्यांग बांधवासाठी स्वतंत्र मंत्रालय, रावेरात आनंदोत्सव साजरा

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर शहरात दिव्यांग बांधवासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळाल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांचे मार्गदर्शना खाली शुक्रवारी लाडू वाटून बँड वाजून आनंद साजरा करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रहार जनशक्ती राष्ट्रीय अध्यक्ष आ. बच्चू भाऊ कडू यांचे प्रहार संघटना शेतकरी जिल्हा अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांनी आभार व्यक्त केले. तसेच आ. बच्चुभाऊ कडू गेल्या 25 वर्षापासून दिव्यांग मंत्रालयाकरता लढत होते, आता आ. बच्चुकडू यांचे संघर्षाला यश मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. बच्चुभाऊ कडू यांचे आभार मानले.

या प्रसंगी शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, रावेर तालुका अध्यक्ष पिंटू धांडे, अल्पसंख्याक रावेर तालुका अध्यक्ष वसीम शेख, दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी, दिनेश पाटील, दिनेश मोरे, मोसिन शेख, जितू कोळी, सफदर पैलवान व सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.