जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२५ । खान्देशातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पश्चिम रेल्वेने जळगाव, भुसावळ मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या साप्ताहिक रेल्वे आता सप्टेंबरपर्यंत धावणार असून, प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

दर शुक्रवारी धावणाऱ्या गाडी क्रमांक ०९०४९ दादर-भुसावळ व गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ-दादर साप्ताहिक रेल्वे आता २६ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. तर सोमवार, बुधवार, शनिवारी धावणाऱ्या गाडी क्र. ०९०५१ दादर-भुसावळ व गाडी क्र. ०९०५२ भुसावळ-दादर त्रि-साप्ताहिक रेल्वेला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या रेल्वेंना जळगाव थांबा आहे.

तर भुसावळ थांबा असलेल्या गाडी क्रमांक ०४१५६ उधना-सुभेदारगंज ही दर मंगळवारी धावणाऱ्या रेल्वेला ३० सप्टेंबर तर गाडी क्र. ०४१५५ सुभेदारगंज-उधना ही दर सोमवारी धावणाऱ्या रेल्वेला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बडनेरा-नाशिक रोड गाडीच्या धावण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी ०१२११ बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी ३० जूनपर्यंत धावणार होती, तिचा कालावधी वाढवून १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या णार आहे. गाडी ०१२१२ नाशिक रोड- बडनेरा जंक्शन अनारक्षित नियमीत विशेष गाडी सुद्धा ३० जूननंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालवण्यात येणार असून, तिच्याही ९२ फेऱ्यांचे नियोजित आहे. यामुळे वाढत्या गर्दीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.









