---Advertisement---
वाणिज्य राष्ट्रीय

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘पीएफ’ वर मिळणाऱ्या व्याजात दरवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २४ जुलै २०२३। ईपीएफओने ( इपीएफओ-Employees’ Provident Fund Organisation) पीएफ मधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. इपीएफओच्या प्रस्ताव स्वीकारत वित्त मंत्रालयाने पीएफवर आर्थिक वर्ष २०२३ साठी ८.१५ टक्के व्याजदर मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदाराला ८.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये २०२१-२२ साठी Eपीएफ वरील व्याज ८.१ टक्के या नीचांकी पातळीवर घसरलं होतं.

jalgaon mahanagar palika 8 jpg webp webp

पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम इपीएफओ (Employees’ Provident Fund Organisation) अनेक ठिकाणी गुंतवते. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. मार्चच्या सुरुवातीला झालेल्या दोन दिवसीय बैठकीत इपीएफओ​​ने आपल्या सदस्यांसाठी २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती.

---Advertisement---

यानंतर, २०२२-२३ साठी Eपीएफ ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यासाठी तो प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, २०२२-२३ साठी Eपीएफ वरील व्याजदर इपीएफओ ​​च्या पाच कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ( इपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) पीएफ वरील व्याजदर वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. Eपीएफ व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे ६ कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख नोकरदार हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते.

ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ ही अपेक्षित होती. कमाईच्या बाबतीत इपीएफओ संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगलं होतं. ईपीएफओचं उत्पन्न वाढलं असून इपीएफओ तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवते जिथून त्याला परतावा मिळतो. आणि याच गुंतवणुकीद्वारे संघटनेच्या सदस्यांना जमा पीएफवर व्याज मिळतं. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणं दिली जात होती.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १२ टक्के रक्कम कपात केली जाते आणि ती रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७ टक्के रक्कम Eपीएफ मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अ‍ॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील तुम्ही पीएफ रक्कम जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---