Jalgaon : यंदाच्या गणेशोत्सवात सुकामेवा करतोय भक्तांचा खिसा हलका ; भावात मोठी वाढ

सप्टेंबर 9, 2024 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२४ । गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करीत आहे. सर्वच सुकामेवाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. प्रामुख्याने काजू, बदाम व अंजीर यांच्या दरातील वाढ मोठी आहे. परिणामी मोदकासह प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागले आहेत.

sukha meva jpg webp

प्रसादात काजूला सर्वाधिक मागणी असते. मात्र मागील महिन्यात ७५० ते ८०० रुपये प्रति किलो असलेला काजू आता किमान ९५० रुपये प्रति किलो झाला आहे. ९५० रुपयांत तुकडा काजू आहे. चांगल्या व मोठ्या काजूचे दर १ हजार ते १०५०-११०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. अनेक ठिकाणी मोदकात नारळाच्या सालनासह अंजीरचे तुकडे टाकले जातात. मात्र हा अंजीरही १६०० रुपये प्रति किलोवर गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now