पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते कडगावात विविध विकासकामाचे उदघाटन

जुलै 30, 2025 5:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील कडगाव येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सामाजिक सभागृह, आधुनिक व्यायामशाळा व मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडपाचा समावेश आहे.

kadgaon

यांची होती उपस्थिती?

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, योगेश कोळी, सरपंच सौ. अलकाबाई कोळी, उपसरपंच प्रवीण कोळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, सचिन पाटील, दीपक कोळी, किरण धनगर, नवल कोळी, नंदू कोळी, नरेंद्र सपकाळे, मधुकर धनगर, सागर कोळी, संदीप कोळी, भूषण पाटील तसेच ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले की, “ही व्यायामशाळा म्हणजे केवळ दंड-बैठका टाकण्याची जागा नसून नव्या पिढीच्या घडणीसाठीची प्रयोगशाळा आहे. सामाजिक सभागृह गावाच्या एकतेचे प्रतीक आहे, तर मरीमाता मंदिरातील सभामंडप श्रद्धा आणि संस्कृती यांची सांगड घालतो.” गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कडगाव धनगर वाड्यातील १५ लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १५ लाखांच्या निधीतून साहित्यासह उभारलेली व्यायामशाळा व १२ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडप अशा एकूण ४२ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे आज श्रावण सोमवारच्या दिवशी लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धनगर यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कोळी यांनी मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now