⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव तर्फे खेळांच्या प्रतियोगीतेचे थाटात उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । दरवर्षी प्रमाणे गेल्या ५ वर्षापासून मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव तर्फे जळगाव शहरातील मराठा समाजातील विविध वयोगटातील मुले ,मुली ,महिला ,पुरुष व जेष्ठ नागरिकांसाठी शहरात विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन होत असते, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव तर्फे विविध इनडोर व आउट डोअर खेळांच्या प्रतियोगीताचे जळगाव जिल्हा क्रीडा संकुल व नूतन मराठा महाविद्यालय प्रांगण जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहेत.

त्यामध्ये पुढील प्रमाणे खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. बॅडमिंटन ,टेबल टेनिस ,बुद्धिबळ ,कॅरम , व व्हॉलीबॉल या सर्व खेळामध्ये पुरुष व लहान मुले महिला व जेष्ठ नागरिक मिळून 250 स्पर्धक सहभागी होऊन रोज खेळत आहेत. मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव तर्फे हे खेळ समजत खेळ भावना जागृत व्हावी नागरिकांचे फिटनेस चांगले राहावे व लहान मुलांना या विविध खेळात चालना मिळावी जेणेकरून ते पुढे विशेष प्राविण्य दाखवतील या उद्देशातून हे सर्व मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव तर्फे दरवर्षी राबविण्यात येते.

या उदघाटन प्रसंगी जळगाव शहराचे माजी पालकमंत्री मा.अप्पासाहेब गुलाबराव देवकर, उपमहापौर कुलभूषणदादा पाटील ,उद्योजक प्रा.डी.डी.बच्छाव सर, मा. प्रमोदनाना पाटील ,श्रीराम दादा पाटील ,डॉ. संभाजी देसाई, लीनाताई पाटील ,रश्मीताई हिरेश कदम व इंजिनियर राहुल पवार व मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव नियोजन व आयोजन समिती सदस्य इत्यादी जण उपस्थित होते.