---Advertisement---
एरंडोल

एरंडोलला ‘कल्पतरू अभ्यासिकेचे’ उद्घाटन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । मैत्री सेवा फाउंडेशन संचालित “कल्पतरू वाचनालय व अभ्यासिका” चे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सैन्यात निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

jalgaon 2022 11 13T190008.905

बालाजी उद्योग समूहाचे संचालक संजय काबरा, विशाल तिवारी, पंकज काबरा,पो.नि. ज्ञानेश्वर जाधव, मा. नगराध्यक्ष रमेश परदेशी, विजय महाजन, राजधर महाजन, डॉ. सुरेश पाटील, योगेश महाजन, कैलास महाजन, उमेश महाजन, आनंद दाभाडे, अमित पाटील, अभिजीत पाटील, राजेंद्र चौधरी, आनंदा चौधरी, कुणाल चौधरी, शालिक गायकवाड, चिंतामण पाटील, दशरथ चौधरी, रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काही मान्यवरांनी अभ्यासिकेला मदत घोषित केली. प्रास्ताविक पियुष चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर महाजन यांनी केले आभार प्रदर्शन पंकज पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम महाजन श्याम सिंग पाटील तुषार महाजन गौरव महाजन चेतन शिंपी संतोष जयस्वाल आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---