⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मू.जे.महाविद्यालयात विद्यापीठाच्या “के-आयएडीसी” उपकेंद्रांचे उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । केंद्रासह राज्य शासन सध्या स्टार्टअप उद्योग सुरु करण्यावर भर देत आहे. त्यासाठी खानदेशात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “केसीआयआयएल” ची उभारणी झाली आहे. या अनुषंगाने सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठाच्या “k-cIIl” या केंद्राद्वारे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये “K-IEDC” या उप-केंद्रांची स्थापना करण्याचे ठरविले आहे. या निमित्ताने मुलजी जैठा महाविद्यालय येथे प्रा. भूषण चौधरी, संचालक “केसीआयआयएल” यांच्या हस्ते “K-IEDC” या उप-केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला त्यांच्या समवेत प्रा.विकास गीते, संचालक “केसीआयआयएल”; मनविन छढा, “CEO” “केसीआयआयएल”; निखील कुलकर्णी, व्यवस्थापक, “केसीआयआयएल” यांनी “केसीआयआयएल” आणि “के-आयएडीसी” यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. या केंद्राद्वारे, नवसंकल्पनांवर आधारित उद्योजकांना, इच्छुकांना, तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर, व्यावसायिक मार्गदर्शन आणि विश्लेषणात्मक,वैद्यानिक नमुना प्रक्रियेसाठी प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध करणे, उत्पादन विकास, चाचणी आधारभूत मदत करणे, बौद्धिक मालमत्ता अधिकाराबद्दल मार्गदर्शन हा त्यामागचामुख्य हेतू असून या मध्ये प्राध्यापकांचा सहभाग खूप मोठा ठरणार आहे असे प्रतिपादन केले. जवळपास ५० प्राध्यापकांनी आणि ४० पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. स. ना. भारंबे होते. महाविद्यालयातील इंकुबेशन केंद्राविषयी प्रा. केतन नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना डॉ. भूषण कविमंडन, सूत्रसंचालन डॉ. मनोजकुमारझु चोपडा आणि आभार प्रदर्शन -सौ. नम्रता वि. चोरडिया यांनी केले.